Jackie Shroff Bhidu : 'भिडू' शब्द वापरायचाय? आधी माझी परवानगी घ्या.. जग्गू दादाची दिल्ली हायकोर्टात धाव

Jackie Shroff Moves to HC : आपल्या परवानगीशिवाय आपले फोटो, आवाज, नाव आणि 'भिडू' हा शब्द वापरल्याप्रकरणी कित्येक कंपन्यांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
Jackie Shroff Bhidu
Jackie Shroff BhidueSakal

Jackie Shroff on Copyright of 'Bhidu' : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ हे नेहमीच चर्चेत असतात. 'भिडू' हा त्यांचा परवलीचा शब्द. जॅकी श्रॉफ म्हटलं की 'भिडू' हा शब्द ओघाने येतोच. मात्र आता याच शब्दाबद्दल जग्गूदादाने हायकोर्टात धाव घेतली आहे. केवळ हेच नाही, तर आपलं नाव, फोटो आणि आवाजाच्या बेकायदा वापराबद्दल देखील त्याने याचिका दाखल केली आहे.

Jackie Shroff Bhidu
Jackie Shroff Viral Video : बोले तो भिडू, जग्गू दादाची फेमस रेसिपी अंडा कढीपत्ता कशी बनवायची माहितीय?

याप्रकरणी न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्यासमोर सुनावणी पार पडली. जॅकी श्रॉफच्या याचिकेमध्ये काही ठराविक कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्या सर्व कंपन्यांना याप्रकरणी न्यायालयाने समन्स बजावलं आहे. यावर आता बुधवारी (१५ मे) सुनावणी होणार आहे. लाईव्ह लॉने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (latest marathi news)

जॅकी श्रॉफच्या नावाचा, फोटोंचा, आवाजाचा तसंच भिडू या शब्दाचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्या लोकांविरोधात हा खटला दाखल करण्यात आल्याचं जॅकी श्रॉफच्या बाजूने सांगण्यात आलं. या गोष्टींचा गैरवापर होत असल्यामुळे जॅकी नाराज आहे. जॅकी श्रॉफच्या वतीने प्रवीण आनंद या वकिलांनी बाजू मांडली. या सर्व प्रकारामुळे जॅकीच्या पब्लिसिटी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Jackie Shroff Bhidu
Jackie Shroff: सेल्फी काढायला आला चाहता, अन् जग्गू दादांनी मारली जोरदार टपली; भिडूचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

यावेळी प्रवीण यांनी इतर अभिनेत्यांची उदाहरणं देखील दिली. अनिल कपूर किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे पर्सनॅलिटी राईट्स (Personality Rights) देखील सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 'भिडू' हा जॅकी श्रॉफचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क असून; एक व्यक्ती या नावाने रेस्टॉरंट चालवत असल्याचंही प्रवीण यांनी न्यायालयात सांगितलं.

कित्येकांनी थांबवला वापर

या याचिकेबाबत आगाऊ सूचना मिळाल्यामुळे काही लोक सुनावणीला उपस्थित होते. आपण जॅकी श्रॉफचे फोटो, आवाज अशा गोष्टी आपल्या वॉलपेपर किंवा रिंगटोनमध्ये वापरणं थांबवलं असल्याचं त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं. इतरही कित्येक लोक टी-शर्ट, पोस्टर, मग आणि इतर ठिकाणी जॅकी श्रॉफचे फोटो वापरतात. विना परवनागी असं करण्याची परवानगी त्यांना नाही; असंही प्रवीण यांनी म्हटलं.

Jackie Shroff Bhidu
India Vs Bharat वादात 'भिडू'ची उडी! म्हणाले, "माझं पण नाव जॅकी मात्र ...",

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com