Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं भाषण सध्या सगळीकडे गाजत आहे. नानांनी आजवर अनेक अविस्मरणीय भूमिका नाटक आणि सिनेमांमध्ये साकारल्या. नुकत्याच केलेल्या भाषणात त्यांनी नटसम्राट नाटकावर भाष्य केलं..नागपूरला भरलेल्या जलसंपदा अधिवेशनात नानांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि इतर गाजलेल्या भूमिका यावर भाष्य केलं. काय म्हणाले नाना जाणून घेऊया.."ज्यावेळी मला नटसम्राटसाठी विचारलं तेव्हा मी म्हटलं मी नाटक नाही करणार मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्यात प्रत्येकवेळी ओतायचा तर मला असं वाटतं की दहा किंवा पंधरा किंवा पंचवीस प्रयोगानंतर मी मेलो असतो. एकदाच सिनेमामध्ये केलं म्हणून राहिलो."."डॉ लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त ज्यांनी ज्यांनी नटसम्राट नाटक केलं आहे ते सगळे हार्टअटॅकने गेले. त्यात तेवढं ओतल्याशिवाय तो आनंद देताच येणार नाही. मी जेव्हा नटसम्राट केलं तेव्हा माझ्यासमोर त्यांची उदाहरणं होती. आम्ही केलेलं आहे ते एवढंसं आहे पण त्यांनी केलेलं सगळ्यांना बघायला मिळालं नाही. काय काम करायचे ते. तिथून हलता यायचं नाही." असं ते म्हणाले..2016 मध्ये नानांचा नटसम्राट सिनेमा रिलीज झाला होता. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा सुपरहिट झाला होता..महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.