30 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करणारे परेश रावल हे केवळ एक अभिनेते नाहीत, तर एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहेत. तब्बल 240 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'हेरा फेरी'मधील बाबूराव गणपतराव आपटे हे पात्र त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेलं, पण त्यांच्याच मते, 'गळ्याचा फास' ठरलेलं!