
Marathi Entertainment News : छावा सिनेमात अक्षय खन्नासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता संतोष जुवेकरने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत. या सिनेमात त्याने रायाजी तर अक्षय खन्नाने औरंगजेबही भूमिका साकारली होती. सिनेमाच्या सेटवर तो अक्षय खन्नाशी न बोलल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यावरून त्याला ट्रोल केलं गेलं होतं. या ट्रोलिंगनंतर पहिल्यांदाच संतोष व्यक्त झाला.