Shashank Ketkar Announces New Film ‘Kairi’
esakal
Premier
शशांक केतकरची मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री! ‘कैरी’मधील त्याचा लूक रहस्यमय
Shashank Ketkar Announces New Film ‘Kairi’: अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘कैरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवसोबतचा त्याचा हा नवा प्रोजेक्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेता शंशाक केतकर याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेतून शंशाक केतकर श्री नावाने घरोघरी पोहचला. चाहत्यांना त्याची श्रीरंगची भूमिका प्रचंड आवडली. सध्या शंशाक केतकर मुंरबा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान आता या सगळ्यात शशांकने चाहत्यांना एक गुडन्युज दिली आहे.
