TIGER SHROFF PLAYS CRICKET IN UNDERWEAR, GETS TROLLEDesakal
Premier
Viral Video: अर्धनग्न अवस्थेत क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'चड्डी क्रिकेट टुर्नामेंट'
TIGER SHROFF PLAYS CRICKET IN UNDERWEAR: अभिनेता टायगर श्रॉफ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये टायगर अंडरविअर घालून क्रिकेट खेळताना दिसतोय.
अभिनेता टायगर श्रॉफ याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. तो नेहमी फिट राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्या फिटनेस आणि डान्सिंगमुळे चाहत्यांना तो फार भावतो. दरम्यान सध्या टायगर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलय.