बालिका वधू फेम अविका गौरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. बालिका वधू मालिकेतून ती घराघरात पोहचली. ससुराल सिमर का मालिकेतही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान आता अविकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अविकाने तिचा बॉयफ्रेंड मिलिंदसोबत साखरपुडा केला आहे. ते दोघेही गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.