
Bollywood Box Office : अभिनेत्री कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी हा सिनेमा 17 जानेवारीला प्रदर्शित झाला. बराच काळ वादात अडकलेल्या या सिनेमाचं प्रदर्शनही खूप रखडलं. अखेर हा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पण पहिल्याच आठवड्यात सिनेमाची कमाई बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ठरली आहे.