अभिनेत्री करिना कपूर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान करिनाने अनेक चित्रपटात सलमान खानसोबत काम केलय. 'मिस्टर अँड मिसेस खन्ना', 'बजरंगी भाईजान', 'बॉडीगार्ड'सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये दोघांच्या जोडीने कमाल केली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सलमानच्या एका चित्रपटात बेबोचं गाणं सुद्धा होता. परंतु इतकं सगळं असतानाही करिनाला सलमान खान अजिबात आवडत नाही. एका मुलाखतीत तिने सलमान किती वाईट आहे? याबद्दल सांगितलं होतं.