
Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना गेला बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या योजनेबाबत विविध अपडेट्स पाहायला मिळतात. तर सुरुवातीपासूनच या योजनेमुळे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. हे सगळे वाद रंगले असतानाच मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत्रीने या योजनेबद्दल तिचं मत स्पष्टपणे व्यक्त केलं.