Renuka Shahane Slammed Hindi & Marathi Serial Makers
esakal
Premier
"स्त्री सशक्तीकरण म्हणायचं आणि कारस्थान करणाऱ्या बायका दाखवायच्या" रेणुका शहाणेंनी मालिकांवर ओढले ताशेरे
Renuka Shahane Slammed Hindi & Marathi Serial Makers : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या मालिकांमध्ये काम का करत नाहीत याचं कारण सांगितलं. याबरोबरच सध्याच्या मालिकांच्या कथानकांवर ताशेरे ओढले.
Entertainment News : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी आणि हिंदी भाषेमधील विविध कलाकृतींमध्ये काम करत स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. एक उत्तम अभिनेत्रीबरोबरच त्या त्यांच्या ठाम मतांसाठीही प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांविषयी त्यांचं मत व्यक्त केलं.

