Rupali Bhosale Shares How Swami Samarth Saved Her
esakal
Marathi Actress Rupali Bhosale: रुपाली भोसले ही मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आई कुठे काय करते मालिकेनंतर तिला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. मालिकेतील संजनाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. या मालिकेत तिने एका खलनायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेतील संजना प्रेक्षकांना प्रचंड भावली. दरम्यान सध्या लंपडाव मालिके रुपाली आपल्या अभिनयाची छाप पाडते. रुपाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमीच चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन घडमोडी सांगत असते. अशातच रुपालीने स्वामींची आलेली प्रचिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.