

Marathi Entertainment News : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत तेजश्रीने स्वतःची ओळख निर्माण केलीये. एक आदर्श अभिनेत्री म्हणून जनमानसात तिची प्रतिमा आहे. पण काही वर्षांपूर्वी बबलू बॅचलर या सिनेमात तिने केलेल्या किसिंग सीनमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या सीनबद्दल तिने दिलेली मुलाखत पुन्हा चर्चेत आहे.