Urvashi Rautela : सिनेमाच्या सेटवर उर्वशी रौतेला गंभीर जखमी ; रुग्णालयात केलं दाखल

Urvashi Rautel injured during movie shoot : अभिनेत्री उर्वशी रौतेला हैद्राबादमध्ये 'एनबीके 109' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Urvashi Rautela Accident
Urvashi Rautela AccidentEsakal

Urvashi Rautela Latest Update : सोशल मीडिया सेन्सेशन असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. उर्वशी बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उर्वशी रुग्णालयात दाखल असून एनबीके 109 या सिनेमाच्या शुटींगदरम्यान ती सेटवर गंभीर जखमी झाली. हाती लागलेल्या वृत्तानुसार, उर्वशीला फ्रॅक्चर झालं असून हैदराबादमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

येत्या काळात उर्वशीचे अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांच्या शूटिंगमध्ये सध्या ती व्यस्त आहे. सध्या तिच्या एनबीके 109 या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असून या सिनेमात तिच्याबरोबर नंदमुरी बाळकृष्ण आणि बॉबी देओल हे कलाकार काम करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानच तिला अपघात झाला असून ही बातमी तिच्या टीमने माध्यमांबरोबर शेअर केली.

फ्रीप्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, उर्वशीच्या टीमने सांगितलं कि, ती हैदराबादमध्ये सिनेमाचं शूटिंग करत होती त्या दरम्यान तिचा हा अपघात झाला. उर्वशी कोणतातरी स्टंट शूट करत असताना ही घटना घडली आणि ती जखमी झाली. तिला फ्रॅक्चर झालं असून नेमक्या कोणत्या भागात फ्रॅक्चर झालं आहे हे अजून तिच्या टीमने शेअर केलं नाहीये. सध्या हैदराबादमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Urvashi Rautela Accident
Urvashi Rautela : होऊ दे खर्च! उर्वशीच्या वाढदिवसाला चक्क 'तीन कोटीं'चा केक? हनी सिंगचं मोठं गिफ्ट

एनबीके 109 या सिनेमाच्या शूटिंगच्या तिसऱ्या शेड्युलसाठी उर्वशी हैदराबादला गेली होती. या सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असून एका वेगळ्या अंदाजातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बॉबी कोल्लीने केलं असून थमन एस के या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन करत आहे.

Urvashi Rautela Accident
Urvashi Rautela : होऊ दे खर्च! उर्वशीच्या वाढदिवसाला चक्क 'तीन कोटीं'चा केक? हनी सिंगचं मोठं गिफ्ट

२०२३ पासून या सिनेमाचं शूटिंग सुरु असून नोव्हेंबर २०२४ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं काही शूटिंग अजून बाकी असून आता उर्वशीला झालेल्या दुखापतीमुळे हे शूटिंग लांबणार का याचीही चर्चा रंगली आहे. तसंच सिनेमाच्या रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा सिनेमाच्या टीमकडून करण्यात आली नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com