Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतचं घर प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला भाड्यानं; म्हणाली, "हा फ्लॅट..."

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फ्लॅट भाड्याने घेतला आहे
Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajputsakal

Adah Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटामुळे अदाला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अदाचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' (Bastar: The Naxal Story) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सध्या अदा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अदाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फ्लॅट भाड्याने घेतला आहे. अदा सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे.

सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली अदा

अदा ही सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये अदाने सुशांतचा फ्लॅट 3 वर्षांसाठी भाड्यानं घेतला. एका मुलाखतीत अदा म्हणाली, "चार महिन्यांपूर्वी मी सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर लगेचच मी माझ्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाले. त्यामुळे मला जास्त वेळ मिळाला नाही. यानंतर मी मथुरेच्या अभयारण्यात गेले होते. तिथून परत आल्यानंतर मी या फ्लॅटमध्ये राहू लागले. माझी आई, आजी आणि आम्ही सर्वजण या फ्लॅटमध्ये एकत्र राहतो."

"आता मला थोडा वेळ मिळाला आहे, त्यामुळे मी फ्लॅटमध्ये पूर्णपणे सेटल होऊ शकले. मी पाली हिल येथे एका घरात राहत होतो. तिथे माझे बालपण गेले. त्याच्याशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मुंबईत दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा फ्लॅट मला खूप सकारात्मक vibes देतो. मी vibes बद्दल खूप संवेदनशील आहे.", असंही अदानं सांगितलं

Sushant Singh Rajput
Adah Sharma: 'दहशतवादी खरे व्हिलन, मुस्लिम नव्हे..'; फ्रॉड म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अदा शर्माने सुनावलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com