Adah Sharma: 'दहशतवादी खरे व्हिलन, मुस्लिम नव्हे..'; फ्रॉड म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अदा शर्माने सुनावलं!

Adah Sharma: इफ्तार पार्टीतील अदाच्या हजेरीची सोशल मीडियावर चर्चा झाली. काही नेटकऱ्यांनी अदाला ट्रोल केलं आहे. अशातच आता अदानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Adah Sharma
Adah Sharmaesakal

Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्माला (Adah Sharma) द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच अदाचा 'बस्तर द नक्सल स्टोरी' हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. अदा ही तिच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असते. अदानं काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. इफ्तार पार्टीतील अदाच्या हजेरीची सोशल मीडियावर चर्चा झाली. काही नेटकऱ्यांनी अदाला ट्रोल केलं आहे. अशातच आता अदानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेटकऱ्यानं केलं ट्रोल

अदाचा इफ्तार पार्टीतील व्हिडीओ ट्विटरवर (X) सोशल मीडियावर शेअर करुन एका नेटकऱ्यानं अदाला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "ही किती फ्रॉड आहे, काही दिवसांसाठी मुस्लिम हे या लोकांसाठी खलनायक असतात आणि तुम्ही त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण चित्रपट बनवता आणि इतर दिवशी मुस्लिम हे या लोकांसाठी छान असतात कारण तुम्हाला बिर्याणी खाण्यासाठी ते आमंत्रित करतात."

अदानं नेटकऱ्याच्या या ट्वीटला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं ट्वीटला रिप्लाय दिला, "सर, दहशतवादी व्हिलन असतात. मुस्लिम लोक खलनायक नसतात."

"मॅडम प्लिज मुस्लिम लोकांच्या विरोधातील प्रोपगंडा चित्रपट बनवू नका, मी तुमचा खूप मोठा चाहता होतो" असंही ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं. या ट्वीटला अदानं रिप्लाय दिला, " मी दहशतवाद्यांविरोधात चित्रपट बनवला. मला खात्री आहे की तुम्ही देखील त्यांच्या विरोधात आहात."

Adah Sharma:
Adah Sharma:twitter
Adah Sharma
Bastar Adah Sharma: 'द केरळ स्टोरी'नंतर अदाचा नवीन सिनेमा 'बस्तर'ही वादात, दिग्दर्शकाला धमकी

अदाचा ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट छत्तीसगडमधील घटनांवर आधारित आहे. अमरनाथ झा लिखित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, रायमा सेन, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा, यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे.

Adah Sharma
Adah Sharma at Lalbaugcha Raja: अदा शर्माने लालबागच्या राजाच्या चरणी केला शंखनाद, व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com