VIDEO: गुलाबी साडीनंतर आता कन्नड गाण्यावर अविनाश-ऐश्वर्या यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Aishwarya Narkar And Avinash Narkar: अविनाश यांचा अतरंगी डान्स आणि ऐश्वर्या यांनी त्यांना दिलेली साथ चाहते मनापासून एन्जॉय करतात.
गुलाबी साडीनंतर आता कन्नड गाण्यावर अविनाश-ऐश्वर्या यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
गुलाबी साडीनंतर आता कन्नड गाण्यावर अविनाश-ऐश्वर्या यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षावesakal

Aishwarya Narkar And Avinash Narkar: मराठी सिनेविश्वातील सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar). सोशल मीडियावर या जोडीचे डान्स रील्स कायमच चर्चेत असतात. अविनाश यांचा अतरंगी डान्स आणि ऐश्वर्या यांनी त्यांना दिलेली साथ चाहते मनापासून एन्जॉय करतात. या जोडीने आणखी एक आणखी एक डान्स रील शेअर केलं आणि सोशल मीडियावर हे रील सध्या चर्चेत आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी कन्नड गाण्यावर सुंदर डान्स केला. अविनाश यांचे हावभाव आणि डान्सचं अनेकांनी कमेंट्समध्ये कौतुक केलं. एकाने "मँडम तुम्ही दोघे खुप छान करता डान्स" अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं तर एकाने "तुम्ही दोघे कमाल आहात" असं म्हणत त्यांचं कौतुक केलं. काहींनी तुम्ही खूप क्युट आहात अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं.

ऐश्वर्या यांनी या व्हिडिओला "आयुष्याच्या प्रवासाचा एकत्र आनंद घेताना" असं कॅप्शन दिलं आहे. हा त्यांच्या व्हिडीओ अमोल बावडेकर यांचा मुलगा अद्वैत बावडेकर याने शूट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या आधीही या दोघांचे अनेक डान्स रील्स व्हायरल झाले आहेत. ''तेरी बातों में ऐसा उलझा जिया' असो किंवा 'कच्चा बदाम' आणि 'सामी' वरील त्यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चांगलेच गाजले. त्यांच्या या डान्सने अनेकांची मनं जिंकली.

पाहा व्हिडीओ:

गुलाबी साडीनंतर आता कन्नड गाण्यावर अविनाश-ऐश्वर्या यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
Aishwarya Narkar Dance: 'असं नाचता यायला पाहिजे!' ऐश्वर्या- अविनाश नारकर यांचा डान्स पाहून व्हाल फिदा!

त्यांच्या कामाबाबत सांगायचं झालं तर सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत पण त्यांची ही मालिका लवकरच संपणार आहे. तर त्यांचा स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमात ते भालजी पेंढारकर यांची भूमिका साकारत आहेत. १ मे २०२४ ला त्यांचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर ऐश्वर्या यांची सध्या झी मराठीवर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेत त्या साकारत असलेली रुपालीची खलनायकी व्यक्तिरेखा चांगलीच गाजतेय. रुपाली ही विरोचक या राक्षसाचं रूप असून त्याचा विनाश त्रिनयना देवी करणार असल्याचं ग्रंथात लिहिलं आहे. विरोचक आणि त्रिनयना देवीच्या लढाईची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

गुलाबी साडीनंतर आता कन्नड गाण्यावर अविनाश-ऐश्वर्या यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
Aishwarya And Avinash narkar: होळी आधी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, "लय भारी"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com