अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

AJAY DEVGN JUHU BUNGALOW BMC STOP WORK NOTICE: अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू बंगल्याच्या प्रस्तावित व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झाला आहे. बंगल्यात सलून आणि स्पा सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी नसल्याचं सांगत BMC च्या के-वेस्ट वॉर्डने स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे.
AJAY DEVGN

AJAY DEVGN JUHU BUNGALOW BMC STOP WORK NOTICE

esakal

Updated on

BMC ACTION OVER AJAY DEVGN SALON AND SPA PROPOSAL: प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याच्या जुहूतील बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झालाय. मुंबई पालिकेच्या के-वेस्ट वॉर्डनं बंगल्यात सलून आणि स्पा सुरू करण्याच्या कामाला स्टॉप वर्क नोटीस बजावलीय. या जागेच्या व्यावसायिक वापरासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान आता देवगण कुटुंबियांनी उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com