नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मराठी सिनेसृष्टीतून ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच अजय देवगणला सुद्धा 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरने भूरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटींना देवमाणूस चित्रपटाचा ट्रेलरवर प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत.