

Entertainment News : संजय दत्त यांचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे, आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाची झलक पाहता, तो सत्य घटनांवर आधारित असून भारताच्या इतिहासातील काही वादग्रस्त पैलूंना स्पर्श करताना दिसतो. यात RSS वर घालण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीदशी संबंधित काही अशा गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या आजपर्यंत पूर्णपणे समोर आल्या नाहीत.