Akshay Kumar and Anees Bazmee Reunite After 15 Years
esakal
अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अनिस बज्मी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तब्बल १५ वर्षाच्या कालावधीनंतर हे दोघे एका नव्या चित्रपटासाठी एकत्र येत असल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट एक कौटुंबिक कॉमेडी ड्रामा असणार असून, त्याची निर्मिती दक्षिणेतील अनुभवी निर्माता दिल राजू करत आहेत.