AKSHAYE KHANNA’S VIRAL ENTRY DANCE
esakal
बॉक्स ऑफिसवर अभिनेता रणवीर सिंह याच्या धुरंधर सिनेमाचीच हवा पहायला मिळत आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला तरी मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणवीरपेक्षा अभिनेता अक्षय खन्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे. धुरंधरमधील त्यांच्या एन्ट्री डान्सने सगळ्यांना वेडं करुन सोडलंय. सध्या त्यांची सिनेमातील स्टेप्स सोशल मीडियावर ट्रेण्डवर आहे.