akshay khanna notice
esakal
सध्या अक्षय खन्ना खुप चर्चेत आहे. धुरंधर सिनेमातील रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. तसंच त्याने केलेला एन्ट्री डान्स तर सोशल मीडियावर चर्चेत आहे. रणवीर सिंगपेक्षा सगळीकडे फक्त अक्षय खन्नाचीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. परंतु आता अक्षय दृश्यम ३ मुळे चर्चेत आलाय. त्याने आर्थिक कारणासाठी आणि लूकमुळे दृश्यम ३ मधून तडकाफडकी माघार घेतलीय. यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले.