Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

Lok Sabha Voting: मतदान केल्यानंतर अमेयनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Amey Wagh
Amey Waghsakal

Amey Wagh Share Post: काल (13 मे) लोकसभा निवडणुकीची (lok sabha elections 2024) चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक लोकांनी तसेच सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अमेय वाघनं (Amey Wagh) देखील मतदान केलं. मतदान केल्यानंतर अमेयनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अमेय वाघची पोस्ट

मतदान केल्यानंतर अमेय वाघनं त्याचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये अमेय हा मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवताना दिसत आहे. या फोटोला अमेयनं कॅप्शन दिलं, "आता कोणीही कुठल्याही पक्षात जावं आणि कोणीही कोणाही बरोबर युती करावी ह्यासाठी मी आज परवानगी देऊन आलो!". अमेयच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

Amey Wagh
Suyash Tilak: ऑनलाईन पोर्टलवर नाव सापडलं पण...धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क

अमेयनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

अमेय हा विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यानं पोपट, फास्टर फेणे, घंटा, शटर आणि मुरांबा या चित्रपटात काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या अमेयच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमेयनं काला पानी या हिंदी वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमोल पालेकर, मोहन आगाशे, मृणाल कुलकर्णी या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर गायिका सावनी रवींद्र आणि अभिनेता सुयश टिळक हे मतदान करु शकले नाही. याबाबत त्यांनी एक पोस्ट शेअर करुन खंत व्यक्त केली.

Amey Wagh
Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com