Suyash Tilak: ऑनलाईन पोर्टलवर नाव सापडलं पण...धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क

lok sabha elections 2024 Suyash Tilak Share Post: सुयशनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन मतदानाचा हक्क बजावता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क
Suyash Tilaksakal

Suyash Tilak Share Post on Instagram: लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha elections 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान करण्यासाठी लोक मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत. अनेकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला आहे. पण काहींना मात्र मतदान करताना आले नाही. अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) हा देखील त्यांच्यापैकीच एक आहे. सुयशनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन मतदानाचा हक्क बजावता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

सुयश टिळकची पोस्ट

सुयश टिळकनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता ह्यावेळी सुदैवाने ओनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना (त्यात तीच चूक होतीच) वोटींग बूथला सकाळी 7 वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टल वरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले, म्हणून 3 तास वेगवेगळ्या बूथ वर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते कळले म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली शोधाशोध केली." सुयशच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

"गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे, ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही ह्याची खंत वाटते वाटत राहील.", असंही सुयशनं पोस्टमध्ये लिहिलं.

सुयशनं या पोस्टला कॅप्शन दिलं, "दुर्दैवाने मला मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्यात आलं, कारण यावर्षी माझे नाव यादीतून गायब झाले आहे."

धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क
Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

'या' सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमोल पालेकर, मोहन आगाशे, मृणाल कुलकर्णी या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क
Mohan Agashe: पाच मिनिटं मशीन वाचण्यातच गेली... मतदान केंद्रावर मोहन आगाशे यांनी राजकारण्यांना चांगलंच सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com