'आमचं लग्न 30 मिनिटातच झालं होतं' अनिल कपूर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा, म्हणाले...'ना हनीमून ना...'

ANIL KAPOOR AND SUNITA KAPOOR ANNIVERSARY POST: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी पत्नी सुनीता कपूरसोबतच्या लग्नाला ४२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अवघ्या ३० मिनिटांत झालेलं साधं लग्न, ना हनिमून ना मोठा सोहळा, अशा आठवणी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या.
ANIL KAPOOR

ANIL KAPOOR

esakal

Updated on

ANIL KAPOOR REVEALS SIMPLE 30 MINUTE WEDDING: अनिल कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. ९० च्या दशकामध्ये त्यांच्या सिनेमाची खूप चर्चा रंगायची. आजही अनिल कपूर वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पहायला मिळतात. करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची सुद्धा बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. नुकतेच त्यांच्या लग्नाला ४२ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त अनील कपूर यांनी सुनीता कपूरसोबत एक फोटो शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com