RAJESH KHANNA AND ANITA ADVANI
esakal
SUPREME COURT REJECTS ANITA ADVANI'S PLEA: दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री अनिता अडवाणी यांच्या नात्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 'राजेश खन्नासोबतचं आपलं नातं लग्नासारखं होतं, त्याबाबत मान्यता मिळावी' यासाठी अनिता अडवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसच यावेळी त्यांनी ३बीएचकेची मागणी सुद्धा केली होती. परंतु न्यायलायने याचिका ऐकण्यास नकार दिलाय. या याचिकेत सुनावणी घेण्यासारखं कोणतही कारण नसल्याचं न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी म्हटलय. तसेच या याचिकेला 'लक्झरी लिटिगेशन' असं संबोधलं.