

anshuman vichare
esakal
Anshuman Vichare: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू चालवणारा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंशुमनने आजवर अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. सोबतच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. याच मुलाखतीत त्याने त्याच्या पत्नीच्या व्हायरल व्हिडिओवर देखील भाष्य केलंय.