Arbaaz Khan and Shura Khan Welcome Baby Girl
esakal
अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच आता त्याच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. शनिवारी त्याची पत्नी शूरा खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिने एका मुलीला जन्म दिला. या आनंददायी क्षणामुळे खान कुटुंबात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.