ARSHAD WARSI AND PRATIK GANDHI
esakal
GHAMASAAN MOVIE OTT RELEASE DATE ON ZEE5: मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटामध्ये सर्किट ही भूमिका साकारून स्टारमड प्राप्त झालेला अभिनेता अर्शद वारसी आणि स्कॅम..या सीरीजमधून नावारूपाला आलेला अभिनेता प्रतीक गांधी हे दोन्ही कलाकार घमासान या हिंदी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि गोल्डन रेशियो फिल्म्स करत असून अर्शद आणि प्रतिकसोबत इशिता दत्त, राजपाल यादव, मुरारी कुमार आणि हेमंत शर्मा यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. तिग्मांशू धुलिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त अर्शद वारसी आणि प्रतीक गांधी या दोन कलाकारांशी केलेली बातचीत...