Arti Singh and Dipak Chauhan: भाच्यासोबत वाद तरीही भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; म्हणाला, "वास्तुदोष..."

Arti Singh and Dipak Chauhan: आरतीच्या लग्नसोहळ्याला गोविंदानं (Govinda) हजेरी लावली. यावेळी गोविंदानं आरती आणि दिपक यांना शुभेच्छा दिल्या.
Arti Singh and Dipak Chauhan
Arti Singh and Dipak Chauhanesakal

Arti Singh and Dipak Chauhan: अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंहचा (Arti Singh) काल विवाह सोहळा पार पडला. आरतीनं दिपक चौहानशी (Dipak Chauhan) लग्नगाठ बांधली. आरतीच्या लग्नसोहळ्याला गोविंदानं (Govinda) हजेरी लावली. यावेळी गोविंदानं आरती आणि दिपक यांना शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाला गोविंदा?

आरतीच्या लग्नात गोविंदा हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. आरती आणि दिपकबाबत पापाराझीसोबत बोलताना गोविंदा म्हणाला,"ईश्वर से प्रार्थना है, जो कृपा आरती पर हुई है किसी प्रकार का वास्तुदोष ना लगे."

आरती आणि दिपकचा खास लूक

आरतीनं तिच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. तिनं लाल रंगाचा लेहंगा आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता, तर तिचा पती दिपकनं पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

'या' सेलिब्रिटींनी लग्नसोहळ्याला लावली हजेरी

कपिल शर्मा, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, सुनील ग्रोवर, देवोलीना, युविका चौधरी,अर्चना पूरन सिंह यांनी आरती आणि दिपकच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

आरती आणि दीपक यांनी बुधवारी संगीत समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे आणि तिचे पती विकी जैन, माहिरा शर्मा, युविका चौधरी आणि भारती सिंग या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Arti Singh and Dipak Chauhan
Govinda: गोविंदाची भाची 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; मुंबईतील व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ

गोविंदा आणि कृष्णा अभिषेकचा वाद

गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यात वाद सुरु होता. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे त्यांच्यातील वादाबद्दल बोलले आहेत. पण हा वाद विसरुन गोविंदानं कृष्णाची बहीण आरतीच्या लग्नात हजेरी लावली.

आरतीचा पती दीपक चौहान हा एक व्यावसायिक असून त्याची स्वतःची इव्हेंट कंपनी देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com