

Aruna Irani emotional at husband funeral
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माते आणि एडिटर कुकू कोहली यांचं २५ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झालं. त्यांनी बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. ते ७७ वर्षांचे होते. आज २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील ओशिवारा येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यादरम्यान पतीला शेवटचा निरोप देताना अभिनेत्री अरुणा इराणी पूर्णपणे खचलेल्या दिसल्या. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अरुणा इराणी आता ८० वर्षांच्या आहेत. त्यांना चालतानादेखील दुसऱ्यांच्या मदतीची गरज पडत होती. त्यांची अशी अवस्था पाहून नेटकरीही भावुक झालेत.