मैत्री असावी तर अशी! कोरा चेक देत अशोक सराफ म्हणालेले..., नाना पाटेकरांची सांगितलेली आठवण

NANA PATEKAR AND ASHOK SARAF FRIENDSHIP STORY: मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांची मैत्री अनेक दशकांपासून चर्चेत आहे. संघर्षाच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या नाना पाटेकर यांना अशोक सराफ यांनी मोठा आधार दिला होता.
NANA PATEKAR

NANA PATEKAR

esakal

Updated on

ASHOK SARAF HELPED NANA PATEKAR DURING STRUGGLE: मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार आहे जे ऑनस्क्रीन एकमेकांची वैरी असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र जीवाभावाचे मित्र असतात. अनेकवेळा सिनेसृष्टीत सोबत काम करुन सेलिब्रिटी एकमेकांची खास 'दोस्त' बनतात. मराठी सिनेसृष्टीत सुद्धा असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या मैत्रीचे किस्से नेहमीच ऐकयला मिळतात. त्यातील एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि नाना पाटेकर. यांची मैत्री अनेक दशकांपासून टिकून आहे. करिअरच्या सुरुवातीपासून सुरु झालेला प्रवास आजही तितकाच घट्ट आहे. दरम्यान एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांनी संघर्षाच्या काळात दिलेल्या मदतीची आठवण सांगितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com