
मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला ‘साडे माडे तीन’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात पुन्हा एकदा कुरळे ब्रदर्स – अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या भन्नाट केमिस्ट्रीसोबत सिद्धार्थ जाधवही दिसणार आहे.
या धमाल चौकडीत रिंकू राजगुरूचाही नवा अंदाज पाहायला मिळणार असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवणूक होणार आहे.