Director Ashutosh Gowariker New Marathi Movie
Premier
'आता थांबायचं नाय' नंतर आशुतोष गोवारीकर दिसणार एप्रिल-मे ९ ९ सिनेमात ; साकारणार ही विशेष भूमिका
Director Ashutosh Gowariker New Marathi Movie : दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांचा नवीन मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक कलाकार समोर आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

