Ashvini Mahangade: "त्यांच्या शेवटच्या काही दिवसात..."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Aai Kuthe Kay Karte fame Actress: अश्विनीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अश्विनीनं तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक
Ashvini Mahangadesakal
Updated on

Ashvini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) ही विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत तिनं साकारलेल्या अनघा या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अश्विनी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. तिच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. अशातच आता अश्विनीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अश्विनीनं तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अश्विनीची पोस्ट

तीन वर्षांपूर्वी अश्विनीच्या वडिलांचे निधन झाले. अश्विनी ही तिच्या वडिलांबाबत विविध पोस्ट शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते. आज वडिलांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणदिनी अश्विनीनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अश्विनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज नानांचा तिसरा पुण्यस्मरणदीन... बघता बघता 3 वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा त्यांच्याशिवाय करावा लागलेला प्रवास. पण या सगळ्यात माझ्या विचारात, माझ्यात ते कायम आहेत आणि राहतील. असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन."

अश्विनी महांगडेनं तिच्या वडिलांबाबत काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती.या पोस्टमध्ये अश्विनीनं सांगितलं की, तिचे वडील काही काळ लाकूडतोड्याचे काम करत होते.

अश्विनीनं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केलं. तसेच तिनं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली. अश्विनीला आई कुठे काय करते आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक
Ashvini Mahangade: घर बांधण्यासाठी फळ्या अन् मयतीसाठी जळण...अश्विनीनं सांगितली तिच्या आयुष्यातील लाकूडतोड्याची गोष्ट..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com