
Bollywood Entertainment News : गेल्या वर्षी 2024 मध्ये रिलीज झालेल्या लापता लेडीज सिनेमाचं खूप कौतुक झालं. आमिर खानने या सिनेमाची निर्मिती केलेली तर किरण रावने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही या सिनेमाची निवड भारत सरकारने ऑस्कर अवॉर्डला जाणाऱ्या सिनेमांमध्ये केली. सर्वत्र कौतुक झालेल्या या सिनेमाविषयी सध्या एक चर्चा सुरुये. हा सिनेमा एका परदेशी सिनेमाची कॉपी असल्याचा दावा केला जातोय.