
Tv Entertainment News : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या या मालिकेतील ट्विस्ट टर्न्स चर्चेत असतात. त्यातच आता सोनू आणि टप्पूच्या लग्नाने मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय. सोनू आणि टप्पू पळून जाऊन लग्न करणार असल्याचं समजल्यावर भिडे आणि जेठाचे धाबे दणाणले आहेत. पण मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट आलाय. सोनू आणि टप्पू लग्न करणार नसून दुसऱ्याच कोणाच्या तरी लग्नाची तयारी ते करत आहेत.