‘Avatar: The Way of Water’ Set for India Re-Release
esakal
हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘अवतार’ मालिकेचा भारतातही प्रचंड चाहता वर्ग आहे. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या दुसऱ्या भागाने २०२२ मध्ये प्रदर्शित होताच विक्रमी यश मिळवले होते आणि ती भारतात सर्वाधिक कमाई करणारी हॉलीवूड फिल्म ठरली होती.