Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Harshaali Malhotra: हर्षालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हर्षालीला ओळखणं कठीण झालं आहे.
Harshaali Malhotra
Harshaali Malhotraesakal

Harshaali Malhotra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात मुन्नी ही भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राचं (Harshaali Malhotra) अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हर्षालीनं लहान वयात मुन्नी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच आता हर्षालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हर्षालीला ओळखणं कठीण झालं आहे.

मुन्नीच्या लूकनं वेधलं लक्ष

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुन्नी म्हणजेच हर्षालीच्या बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला. व्हिडीओमध्ये हर्षालीची आई देखील तिच्या मागे उभी असलेली दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

हर्षाली मल्होत्राची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जास्त आहे. इंस्टाग्रामवर तिचे 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हर्षालीचं एक युट्यूब चॅनल देखील आहे.या युट्यूब चॅनेलवर हर्षाली तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करते.

'बजरंगी भाईजान'मुळे मिळाली लोकप्रियता

'बजरंगी भाईजान' या चित्रपटामुळे हर्षालीला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात हर्षालीसोबतच सलमान, नवाजुद्दीन सिद्दीकी, करीना कपूर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला पण आजही हा चित्रपट लोक आवडीनं बघतात.

Harshaali Malhotra
Bajrangi Bhaijaan 2 मधून करीनाचा पत्ता कट?; सीक्वेलमध्ये 'ही' साऊथ अभिनेत्री दिसणार अशी चर्चा..

हर्षालीनं 'या' मालिकांमध्ये केलं काम

बजरंगी भाईजानमधील भूमिकेशिवाय हर्षालीने टेलिव्हिजनवर कुबूल है, लौट आओ त्रिशा  आणि जोधा अकबर सारख्या शोमध्येही काम केले आहे. अनेक जाहिरातींमध्येही तिनं काम केलं आहे.

Harshaali Malhotra
Salman Khan : सलमानच्या 'बजरंगी भाईजान'च्या सह निर्मात्यावर संकट, बंगळुरुमधील मॉलला लावले टाळे! काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com