
Marathi Entertainment News : सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. १६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.