सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसचा अठरावा सिझन लवकरच संपणार आहे. या सिझनच्या ग्रॅंड फिनालेची तारीख जाहीर झाली आहे. सलमान खानने स्वत: तारीख जाहीर केली आहे. बिग बॉसमधील 'वीकेंड का वार' या एपिसोडमध्ये सलमानने फायनलची तारीख जाहीर केली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात 9 स्पर्धक आहेत. त्यामुळे काही दिवसात बिग बॉसच्या अठराव्या सिझनचा विजेता प्रेक्षकांना भेटणार आहे.