
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 मुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरच्या लगीनघाईला सुरुवात झालीये. अंकिता संगीतकार कुणाल भगतबरोबर लग्न करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचं आणि कुणालचं रिलेशनशिप उघड केलं. फेब्रुवारीत त्यांचं लग्न होणार असल्याचं तिने बिग बॉस मराठीत सांगितलं होतं. आणि आता त्यांच्या लग्नाची तारीखही उघड झालीये.