BIGG BOSS MARATHI DRAMA
esakal
Ruchita loses power key in Bigg Boss Marathi: बिग बॉस सुरु होऊन दोन तीन दिवसच झाले आहेत, तोच घरात मोठमोठे राडे होताना पहायला मिळतय. दरम्यान ग्रँड प्रीमियर सोहळ्यात शॉर्टकट निवडलेल्या प्रत्येक स्पर्धकांना रितेश भाऊंनी एक पॉवर key दिली होती. या चावीद्वारे स्पर्धकांना घरात मदत होणार होती. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाला आपली चावी सांभाळून ठेवणं गरजेचं होतं. ही चावी जर दुसऱ्या कोणाकडे गेली तर आपल्याकडे असलेली पॉवर सुद्धा गेली असं बिग बॉसच्या घराचा नियम होता. दरम्यान आता रुचिताला हिच गोष्ट महागात पडणार आहे.