Bigg Boss Marathi 6
ESAKAL
Premier
गौतमी नाहीतर 'ही' लावणी डान्सर बिग बॉसमध्ये दिसणार? सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'मेल आलाय पण...'
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ सुरू होण्याआधीच स्पर्धकांबाबत चर्चा रंगू लागली आहे. गौतमी पाटीलने शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर आता लावणी डान्सर सायली पाटीलचं नाव समोर येत आहे.
बिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोण असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. कलर्स मराठी सोशल मीडियावर बिग बॉस मराठीबाबत अनेक अपडेट्स देत आहे. हे सीझन यंदाही रितेश देशमुख होस्ट करणार असल्याचं स्पष्ट झालय. दरम्यान आता या सीझनमध्ये कोण असणार? याची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अशातच आता अनेक लोकांची नावं सुद्धा समोर येताय.
