SURAJ CHAVAN MISSING FROM BIGG BOSS MARATHI REUNION?
esakal
Bigg Boss Marathi Reunion : कलर्स मराठीवर लवकरच मराठी बिग बॉसचा धुमाकूळ रंगणार आहे. ११ जानेवारी २०२६ पासून रोज रात्री बिग बॉसच्या घरातील मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यंदाच्या सीझनचं थीम ही नर्क-स्वर्गवर असणार आहे. त्यामुळे कोणाला स्वर्ग अनुभवयला मिळणार आणि कोणाला नरक यातना सहन कराव्या लागणार हे लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरवेळी प्रमाणे यंदाही बिग बॉस यंदाच्या सीझनला होस्ट म्हणून रितेश देशमुखच पहायला मिळणार आहे.