Bigg Boss OTT 3: मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?

Salman Khan: बिग बॉस ओटीटी तीसऱ्या सीझनचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?
Salman KhanSAKAL

Bigg Boss OTT 3: बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉसचे वेगवेगळे एपिसोड्स बघायला अनेकांना आवडते. अशातच काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली. बिग बॉस मराठीचे गेले चार सीझन्स महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी होस्ट केले. आता या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. अशातच आता बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) तीसऱ्या सीझनची देखील घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉस ओटीटी तीसऱ्या सीझनचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉस ओटीटीचा प्रोमो व्हायरल

बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाचा प्रोमो जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या गेल्या सीझन्सची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच या प्रोमोमधील एका डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सलमान नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?

बिग बॉस ओटीटीच्या तीसऱ्या प्रोमोच्या शेवटी "झकास" हा अनिल कपूर यांचा डायलॉग ऐकू येत आहे. त्यामुळे सलमान खानच्या ऐवजी अनिल कपूर हे बिग बॉस ओटीटीचा तीसरा सीझन होस्ट करणार आहेत, असा अंदाज लावला जात आहे.

कधीपासून सुरु होणार 'बिग बॉस ओटीटी 3'?

'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचे होस्टिंग करण जोहरनं केलं होतं तर दुसरा सीझन हा सलमान खाननं होस्ट केला होता. आता 'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम कोण होस्ट करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?
Bigg Boss Marathi Season 5 : "महेश मांजरेकरच होस्ट म्हणून हवे"; बिग बॉस मराठीच्या प्रोमोनंतर नेटकऱ्यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com