Bollywood Actress Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. दिशाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आताच्या घडीला बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दिशा पटानीची ओळख झाली. बरेलीतून आलेल्या दिशाचा बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रीपर्यंत पोहचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. सिने जगतात कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर तिने एक वेगळी ओळख निर्माण केली.