2024 मध्ये बॉबी देओल यांनी 'कंगूवा' चित्रपटात व्हिलनचा अभिनय केला होता. या चित्रपटात त्याचे नाव उधिरन होते. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा नेटकऱ्यांनी बॉबी देओलला चांगलेच ट्रोल केले होते. याचं मुख्य कारण होते ते लाऊड बॅकग्राऊंड म्युजिक आणि हिंदी डबिंग. तसंच या चित्रपट हवा तितका चित्रपटगृहातही चालला नाही. आता या चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळाले आहे.