Plane Crash : बायकोने हट्ट केला अन् विमान चुकलं! Plane Crash मधून वाचलेल्या बॉलीवुड सुपरस्टारने केला धक्कादायक खुलासा..

Actor Jitendra Plane Crash Story : 1976 साली झालेल्या विमान अपघातात बॉलीवुडच्या सुपरस्टारचा जीव थोडक्यात वाचला. पत्नीच्या हट्टामुळे ते त्या फ्लाइटने गेले नाहीत आणि मोठ्या दुर्घटनेपासून बचवल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.
Actor Jitendra Plane Crash Story
Actor Jitendra Plane Crash Storyesakal
Updated on

गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे घडलेल्या एका भयानक विमान अपघातात 270 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेने अनेकांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शेअर केलेला एक प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे

नशिब आणि आपल्या माणसांचं प्रेम असेल तर मृत्यूही मागे हटतो,’ असं म्हणणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा एक प्रसंग आजही अनेकांना थक्क करणारा आहे. 1976 साली अहमदाबादजवळ घडलेल्या एका भीषण विमान दुर्घटनेपासून ते फक्त एका "हट्टामुळे" वाचले होते तो हट्ट होता त्यांच्या पत्नीचा.

1976 सालचा तो दिवस होता, जेव्हा जितेंद्र एका महत्त्वाच्या प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना झाले होते. मात्र त्याच दिवशी करवा चौथसारखा खास सणही होता. पत्नी शोभा उपवास करत होत्या आणि चंद्रदर्शनाची वाट पाहत होत्या.

Actor Jitendra Plane Crash Story
'ऋषी कपूर नग्न होते, म्हणून मी सीन नाकारला' दिग्गज अभिनेत्रीने इंटिमेंट सीन करण्यासाठी दिलेला नकार, म्हणाली...'त्याच्याकडे पाहून...'

विमानतळावर पोहोचल्यावर जितेंद्र यांना समजले की त्यांची फ्लाइट दोन तास उशिराने आहे. हा वेळ पाहून त्यांनी विचार केला की, घरी जाऊन पत्नीबरोबर करवा चौथचा विधी पार पाडावा. त्यांनी घरी परत यायचा निर्णय घेतला. त्या क्षणी त्यांच्या पत्नीने त्यांना परत विमानतळावर न जाण्याचा हट्ट धरला आणि नशिबाने तो हट्ट ऐकला गेला.

काही तासांनी जेव्हा बातम्या समोर आल्या, तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पायखालची जमीनच सरकली. ज्या विमानातून ते प्रवास करणार होते, ते विमान हवेतच कोसळले होते आणि अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Actor Jitendra Plane Crash Story
VIDEO : "आजपासून तू फक्त ताईचा नवरा" काव्याने जीवाशी संबंध तोडले, प्रेक्षक म्हणाले "शाब्बास..."

हा प्रसंग सांगताना जितेंद्र आजही भावूक होतात. “त्या दिवशी जर शोभाने मला परत बोलावलं नसतं, तर मी आज तुमच्यासमोर नसतो,” असं ते अनेकदा नमूद करतात. त्या दिवशी फक्त शोभाने उपवास केला नव्हता, तर तिच्या प्रेमामुळेच माझा जीव वाचला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या घटनेने जितेंद्र यांचं आयुष्यच बदलून टाकलं. जीवनात नशिबापेक्षा माणसांचे प्रेम किती मोठं असतं, हे त्यांनी त्या दिवशी अनुभवलं. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात काही गोष्टी अगम्य असतात. पण जेव्हा त्या तुमच्या भल्यासाठी घडतात, तेव्हा नियतीचं अस्तित्व पटतं.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com